‘पाच लाख द्या,येरवडा जेल फोडून दाखवतो’

July 24, 2013 9:33 PM0 commentsViews: 2597

24 जुलै : मला पाच लाख रुपये द्या मी येरवडा जेल फोडून दाखवतो असं आव्हान धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांनी गृहमंत्री आर आर पाटील यांना दिलंय. तुरुंगामध्ये सगळं काही कैद्यांच्या मनाप्रमाणेच चालत असतं असा आरोपही अनिल गोटे यांनी केलाय. गोटे हे बनावट मुद्रांक प्रकरणात येरवडा जेलमध्ये चार वर्ष होते. यावर जेलमधल्या हफ्तेगिरीची चौकशी करणार असल्याची घोषणा गृहमंत्री आर आर पाटील यांनी केलीय. तुरूंगात सर्वकाही कैद्यांच्या मनाप्रमाणं चालतं. गँगस्टर मंडळी, जेलर आणि जेलच्या पोलिसांना हफ्ते देतात, त्यामुळे जोपर्यंत पोलीस आणि जेल पोलिसांच्या पगारातली तफावत कमी होत नाही, तोवर जेलमध्ये काहीही घडू शकतं असे खडे बोल तेलगी प्रकरणात चार वर्षं येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगलेले आमदार अनिल गोटे यांनी गृहमंत्री आर.आर. पाटील यांना सुनावले. एवढंच नाही तर पाच लाख रूपये द्या, मी येरवडा जेल फोडून दाखवतो असं आव्हानही त्यांनी आर.आर. पाटलांना दिलंय. त्यावर गोटे यांनी दिलेल्या माहितीची सीआयडी मार्फत चौकशी करण्यात येईल असं आर आऱ पाटील यांनी जाहीर केलं.

close