सत्तेच्या चाव्या आघाडीकडेच, युती विरोधी बाकावर?

July 24, 2013 11:08 PM1 commentViews: 2313

manharashtra433424 जुलै :2014 च्या लोकसभा निवडणुकी अजून वर्षभर तरी दूर आहे पण महाराष्ट्रात सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादींना पुन्हा एकदा सत्ता मिळवण्याची घाई झालीय. यासाठी राष्ट्रवादीने मोर्चेबांधणीला सुरूवात केलीय. तर दुसरीकडे विरोधी पक्ष शिवसेना,भाजप आणि मनसेनं सत्ताधार्‍यांना खाली खेचण्यासाठी कंबर कसली आहे. जर महाराष्ट्रात आज निवडणुका झाल्या तर काय चित्र राहिल यासाठी आयबीएन नेटवर्क आणि द हिंदू यांच्यासाठी सीएसडीएसने सर्व्हे केलाय. या सर्व्हेनुसार लोकसभा निवडणुकीत आघाडीला 23 ते 27 जागा मिळतील तर महायुतीला 18 ते 22 मिळतील आणि मनसेला 2 जागा तर इतर पक्षांना 4 जागा मिळतील असं सर्व्हेवरून स्पष्ट होतंय.

आघाडी सरकारच्या कामावर चालू वर्ष 2013 मध्ये 64 टक्के जनता समाधानी तर 29 टक्के लोकांनी असमाधानी आहे. भ्रष्टाचाराच्या प्रश्नावर 31 टक्के लोकांनी बिघडलंय तर 25 टक्के लोकांनी सुधारलंय असं सांगितलं. तसंच सिंचनाच्या महत्त्वाच्या मुद्यावर 41 टक्के लोकांनी ‘जैसे थे’चं सांगितलं तर 28 लोकांनी बिघडलंय असं सांगितलंय. बळीराजासाठी 28 टक्के सरकार अपयशी ठरलंय तर 41 टक्के लोकांनी पूर्वी जी परिस्थिती होती तीच आहे. त्यामुळे यात नवीन काही घडलंय नाही. महाराष्ट्र राज्य अलीकडेच दुष्काळासारख्या परिस्थिती सामोरं गेलंय. मात्र दुष्काळाचा सामना करण्यास सरकार 14 टक्के लोकांनी समाधानी आहे तर 24 टक्के लोकांनी असमाधानी असल्याचं सांगितलंय. तर भविष्यात आघाडी तोडावी असं 20 टक्के मतदार म्हणताय तर 18 टक्के काँग्रेस समर्थक आणि 21 टक्के राष्ट्रवादी समर्थक म्हणताय. मात्र आघाडी कायम ठेवावी असं 35 टक्के मतदार म्हणताय तर 55 टक्के काँग्रेस समर्थक आणि 58 टक्के राष्ट्रवादी समर्थक म्हणताय.

 

1. आघाडी सरकारचं रिपोर्ट कार्ड

mh4

 

 

 

 

 

 

 

 

2. दुष्काळाचा सामना करण्यात सरकार यशस्वी?

mh5

 

 

 

 

 

 

 

 

3. आघाडी सरकारची कामगिरी

mh3

 

 

 

 

 

 

 
4. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचं भविष्य

mh7

 

 

 

 

 

 

 

महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्ष शिवसेना-भाजपने मनसेसोबत विशालयुतीकरून निवडणूक लढवावी असं 19 टक्के लोकांनी सांगितलंय. तर फक्त भाजप-सेना युतीने एकत्र लढावं असं 25 टक्के लोकं म्हणताय. त्यामुळे युतीचा गड भक्कम असल्याचं चित्र आहे. तर दुसरीकडे शिवसेनेनं लोकसभेची निवडणूक मनसेसोबत लढवावी असं 55 टक्के लोकं म्हणताय तर 18 टक्के लोकांनी नकार दिलाय. तसंच सेनेच्या समर्थकांनी 70 टक्के तर मनसेच्या समर्थकांनी 54 टक्के होकार दर्शवलाय. मात्र मनसेच्या 46 टक्के समर्थकांनी तर सेनेच्या 20 समर्थकांनी नकार दिलाय. तसंच बाळासाहेब ठाकरेंचा वारसा पुढे चालवण्यासाठी राज ठाकरे योग्य आहेत असं 48 टक्के मतदारांनी सांगितलंय. तर 18 टक्के मतदारांनी उद्धव हे योग्य उमेदवार असल्याचं सांगितलं. तर खुद्द शिवसेना समर्थक उद्धव यांच्या पाठिशी 25 टक्के आहे आणि 57 टक्के राज यांच्या पाठिशी आहे. या लोकसभेत महायुतीला 18 ते 22 मिळतील आणि मनसेला 2 जागा तर इतर पक्षांना 4 जागा मिळतील असा कौल जनतेनं दिलाय.

 

1. भाजपने काय करावं?

mha1

 

 

 

 

 

 

 


2. शिवसेनेने लोकसभेची निवडणूक मनसेसोबत लढवावी?

mh6

 

 

 

 

 

 

 

 

3. बाळासाहेब ठाकरेंचा वारसा पुढे चालवण्यासाठी अधिक योग्य कोण?

mh2

 

 

 

 

 

 

 

 

लोकसभेच्या जागा

manharashtra4334

 

 

 

 

 

 

 

  • Pramod

    Ajab janata ahe… evadha bhrashtachar karun suddha tyach mansana satte madhe ananyala utsuk ahe…. Ani nantar apanach shivya ghalat basnar ki hi lok bhrashtachar kartat. Jikade jantelach shahanpan nahi tethe sarkarala tari kase yeil. Te lok ghet bastil yachi maja..

close