हेरॉईन बाळगणा-या आयपीएस अधिका-याला अटक

January 25, 2009 9:50 AM0 commentsViews: 4

25 जानेवारी मुंबईमुंबई एटीसने हेरॉईन बाळगणा-या एका आयपीएस अधिका-याला अटक केली आहे. त्याच्याकडे 13 किलो 850 ग्रॅम हेरॉईन सापडलं आहे. या अधिका-याचं नाव शाजी मोहन आहे. हा अधिकारी जम्मू काश्मीर केडरचा असून कोची इथे नॉर्कोटीक्स कन्ट्रोल ब्युरोचा डायरेक्टर होता. आत्तापर्यंत त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. विकी ओबेरॉय आणि राजेश कुमार अशी त्याची नावं आहेत. त्यांच्याकडून सुमारे 13 किलो 850 ग्रॅम हेरॉइन जप्त करण्यात आलं आहे. याची भारतीय बाजारात किंमत सुमारे प्रति किलो 1 लाख रुपये आहे.

close