अखेर रत्नागिरीत दरड हटवण्याचं काम सुरू

July 25, 2013 1:08 PM0 commentsViews: 113

RAT_LAND_SLIDE.transfer25 जुलै : रत्नागिरीतल्या धामापूर गावात 22 दिवसांपूर्वी दरड कोसळली होती. पण प्रशासनानं त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं होतं. या अत्यंत बेजबाबदार आणि हलगर्जीपणाचा फटका आजुबाजूच्या गावातून धामापूरमध्ये शाळेत येणार्‍या विद्यार्थ्यांना बसत होता. याबद्दलची बातमी आयबीएन लोकमतनं दाखवल्यानंतर आता प्रशासनाला जाग आलीय.

 

जिल्हा परिषदेनं आज दखल घेत या दरडी उचलण्याची यंत्रणा गावात पाठवलीय. धामापूर, कुंभारखणी, म्हावळुंगे या गावांचा संपर्कही या दरडींमुळे गेले बावीस दिवस तुटलेलाच आहे. त्यामुळे ग्रामस्थांचेही हाल होत आहे. हा रस्ता जिल्हा परिषदेचा असून दरड हटवण्यासाठी पैसे नसल्यामुळे त्या हटवण्यात आलेल्या नाहीत असं प्रशासनाकडून ग्रामस्थांना सांगण्यात आलंय.

close