राज ठाकरे वारसदार?

July 25, 2013 6:28 PM0 commentsViews: 716

25 जुलै : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे… बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेनेचं काय आणि त्यांचा वारसदार कोण असा प्रश्न उपस्थित झाला होता. आयबीएन नेटवर्क आणि सी.एस.डी.एस.नं केलेला नॅशनल सर्व्हेनुसार खरा वारसदार म्हणून मनसेचे अध्यक्ष आणि त्यांचे पुतणे राज ठाकरेंना लोकांनी पसंती दिलीय. राज हेच खरे वारसदार असल्याचं आयबीएन नेटवर्क आणि सी.एस.डी.एस.च्या सर्व्हेत 48 टक्के लोकांनी मत व्यक्त केलंय.

 

महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्थान अनन्यसाधारण होतं. त्यांच्या राजकारणाची चर्चा राज्याबाहेर थेट दिल्लीपर्यंत आणि प्रसंगी देशाबाहेरही होत राहिली. त्यांच्या निधनानंतर त्यांचा वारसा चालवण्यासाठी अधिक योग्य कोण अशी चर्चा अजूनही होतेय. बाळासाहेब ठाकरेंचा वारसा पुढे चालवण्यासाठी अधिक योग्य कोण? या प्रश्नावर बहुसंख्य मतदारांचा कौल राज ठाकरेंकडे दिसून येतो. विशेष म्हणजे 57 टक्के शिवसेना समर्थकांचा कल सुद्धा उद्धव ठाकरेंऐवजी राज ठाकरेंकडेच दिसून आलाय.

close