‘कॉलेज निवडणुकांचा प्रस्ताव 15 दिवसात’

July 25, 2013 7:53 PM0 commentsViews: 213

25 जुलै : tope on college election कॉलेजमध्ये निवडणुका पुन्हा सुरू होण्याअगोदरच सध्या ‘वाद’ सुरू झाला आहे. पण, राज्य सरकार या निवडणुका पुन्हा सुरू व्हाव्या, यासाठी सरकार प्रयत्न करतंय. यासंदर्भातला प्रस्ताव 15 दिवसात मंत्रिमंडळासमोर मांडला जाईल, अशी घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानसभेत केली.

पण, मनसेनं त्यावर आक्षेप घेतला आहे. शिवसेनेनं मात्र सरकारनं सर्व पक्षांशी चर्चा करण्याची मागणी केली आहे. तसंच कॉलेज निवडणुकांची नियमावली तयार करून, निवडणुकांची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी अशी मागणी शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी केली आहे.

18 जुलै रोजी कॉलेजमध्ये पुन्हा एकदा निवडणुका सुरू होणार असे संकेत राजेश टोपे यांनी दिले होते. कॉलेजमधल्या निवडणुकीबाबत येत्या 2 ते 3 दिवसात निर्णय घेणार असंही टोपेंनी सांगितलं होतं. जुलैच्या पहिल्या आठवड्यात कॉलेजमध्ये पुन्हा एकदा निवडणुका घेण्याबाबत हालचाल सुरू केली होती. याबाबत सरकारकडे वेगवेगळ्या विद्यार्थी संघटनांकडून मागणीचा प्रस्तावही आला. मात्र हा निर्णय घ्यावा की नाही याबाबत सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतली नव्हती. आता मात्र निवडणुकींचा मार्ग मोकळा होत आहे.

close