बुलेट ट्रेनला भीषण अपघात

July 25, 2013 8:47 PM0 commentsViews: 3312

25 जुलै : स्पेनमध्ये भरधाव वेगात असलेल्या बुलेट ट्रेनला भीषण अपघात झालाय. या अपघातात 78 जणांचा मृत्यू झालाय. तर 140 हून अधिक जण जखमी झाले आहेत. सँटीऍगो शहरात हा दुदैर्वी अपघात झाला. ट्रेनची वेगमर्यादा 80 किलोमीटर प्रति तास असताना ही ट्रेन मात्र त्यापेक्षा दुप्पट वेगानं धावत होती. यामुळेच नियंत्रण सुटल्याने ट्रेन ट्रॅकवरून घसरली आणि भिंतीवर आदळली. युरोपातल्या अतिशय भीषण ट्रेन अपघातांपैकी हा एक अपघात असल्याचं सांगण्यात आलंय.

close