काँग्रेस-राष्ट्रवादीतल्या वादामुळे रूग्णालय धूळखात

July 25, 2013 9:00 PM0 commentsViews: 44

parbhani25जुलै : परभणी जिल्ह्यात ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करुन तीन ग्रामीण रुग्णालयं बांधण्यात आली. पण, काँग्रेस आणि राष्ट्रवादीतल्या वादामुळे त्यांचं उद्घाटनच झालेलं नाही. पण यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहे. पाथरी तालुक्यातलं ग्रामीण रुग्णालय हे चक्क पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृहात सुरू आहे. त्याचीही दुरवस्था झाली असून रुग्णालय ठिकठिकाणी गळतंय. पण याच तालुक्यात बांधण्यात आलेली रुग्णालयाची नवी इमारत मात्र बंद ठेवण्यात आलीय. हीच परिस्थिती जिंतूर आणि बोरीमधल्या ग्रामीण रुग्णालयांची आहे. नवी इमारती बंद ठेवून जुन्या इमारतीत रुग्णालयं सुरू आहेत. काँग्रेसला आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांच्या हस्ते उद्घाटन करायचंय, तर राष्ट्रवादी आर आर पाटील यांच्या हस्ते उद्घाटनासाठी आग्रही आहे. पण या वादात ग्रामीण भागातल्या रुग्णांचे मात्र हाल होत आहे.

close