शिजवायचं की शिकवायचं?

July 25, 2013 4:45 PM0 commentsViews: 683

दीप्ती राऊत, नाशिक

25 जुलै : शालेय पोषण आहार योजना महाराष्ट्रात प्रभावीपणे राबवण्यात येत असल्याचा दावा राज्य सरकार करतंय. पण प्रत्यक्षात ही योजना शिक्षकांसाठी अतिरिक्त बोजा आणि बचतगटांची आर्थिक अडचण यांच्या कात्रीत सापडली आहे.

सादारण दुपारी बाराच्या सुमारास खेडेगावातल्या कोणत्याही जिल्हा परिषदेच्या शाळेत तुम्हाला शिक्षक कोठ्या हलवताना, धान्याची  उचलठेव करताना दिसतील. याचा परिणाम त्यांच्या शिकवण्यावर होतोय. दोन शिक्षकी शाळेत तर एक शिक्षक कायमच मिटींगला किंवा ट्रेनिंगला. मग दुसर्‍या शिक्षकानं 4 वर्गांना शिकवायचं कधी आणि आहाराची व्यवस्था करायची कधी हा प्रश्न. आता शासन म्हणतं, शिक्षकांना खिचडी शिजवावी लागत नाही. बचत गटाच्या महिलेनं 1 हजार रुपयात महिनाभराचं धान्य साफ करुन शिजवायचं, वाढायचं आणि भांडीकुंडीही धुवायची. उरलेल्या 1 हजारात इंधन आणि भाजीपाला. कसं शक्य आहे? प्रत्येक विद्यार्थ्यामागे पोषण मूल्य मिळतंय ते अवघं 300 कॅलरीज आणि 5 ग्रॅम प्रथिनं… म्हणजे शासनाच्या निकषांपेक्षा निम्मेच. बहुतेक यालाच म्हणायचं पोषक आहार..

close