अखेर बिबट्या जेरबंद

July 25, 2013 9:44 PM0 commentsViews: 327

25 जुलै : औरंगाबादेत वन विभागाच्या ताब्यातून निसटलेल्या बिबट्याला अखेर 20 तासांनंतर पुन्हा पकडण्यात आलं. या बिबट्याला गंगापूर तालुक्यातून पकडून औरंगाबादला आणण्यात आलं होतं. पण एका पिंजर्‍यातून दुसर्‍या पिंजर्‍यात नेत असताना बिबट्यानं पिंजर्‍याचा गज वाकवून पळ काढला. बिबट्या निसटल्यानं वन विभागाच्या अधिकार्‍यांचे धाबे दणाणले. आणि त्यांनी पुन्हा शोध मोहिम सुरु केली. बिबट्या ज्या ठिकाणावरुन निसटला त्या ठिकाणाच्या आजुबाजूला मोठा रहिवासी परिसर आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण होतं. पण रात्रभराच्या शोधमोहिमेनंतर अखेर आज सकाळी बिबट्याला पुन्हा पकडण्यात आलं.

close