औरंगाबाद कोर्टाचं राज ठाकरेंना समन्स

January 25, 2009 9:17 AM0 commentsViews: 2

25 जानेवारी औरंगाबादमाधव सावरगावे राज ठाकरे यांना औरंगाबाद कोर्टात हजेरी लावावी लागणार आहे. त्यांना दोन फेब्रुवारीला न्यायदंडाधिकारी कोर्टात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आलं आहे. मराठी -अमराठी वादातून दोन महिन्यापूर्वी औरंगाबादमध्ये दगडफेक झाली होती. या प्रकरणी औरंगाबादच्या क्रांतीचौक आणि छावणी पोलीस ठाण्यात राज ठाकरे आणि काही कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या दोन्ही गुन्ह्यामध्ये 2 फेब्रुवारी रोजी कोर्टात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे. राज ठाकरे यांनी मला हात लावाल तर पूर्ण महाराष्ट्र पेटेल असं व्यक्तव्य केलं होतं. त्यानंतर परप्रांतीय तरुणांना मारहाण केल्याप्रकरणी राज ठाकरे यांना अटकही करण्यात आली होती. त्याचे राज्यात सर्वत्र पडसाद उमटले होते.

close