अब्दुला म्हणतात,1 रुपयांत पोटभर जेवू शकता !

July 26, 2013 3:40 PM9 commentsViews: 1531

abdulla26 जुलै : देशात गरिबीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा वाद रंगलाय. दिल्लीत फक्त 5 रुपयात जेवण मिळतं असं वक्तव्य काँग्रेस नेते रशीद मसूद यांनी केलंय. देशात गरिबी कमी झाल्याचा अहवाल नुकताच नियोजन आयोगानं दिला होता. त्यानंतर मुंबईत फक्त 12 रुपयाला एकवेळचं जेवण मिळतं अशी मुक्ताफळं काँग्रेस खासदार आणि अभिनेते राज बब्बर यांनी उधळली.

आता त्यापाठोपाठ एक रुपयांत जेवण शक्य असल्याचं काँग्रेसचे खासदार आणि केंद्रीय मंत्री फारूख अब्दुल्ला यांनी म्हटलंय. जेवण 1 रूपयातही होतं आणि 100 रूपयातही होतं, फक्त तुम्हाला खायचं काय आहे हे ठरवता आलं पाहिजे. सरकार जनतेला दोन वेळच जेवण मिळावं यासाठी प्रयत्न करत आहे असंही अब्दुला यांनी म्हटलंय. मात्र विरोधकांनी काँग्रेस नेत्यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला.

मुंबईत 12 रूपयात पोटभर जेवण कसं मिळू शकत हे राज बब्बर यांनी दाखवूनट द्यावं असं आव्हान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिलं. मुंबईत चहा सुद्धा 12 रूपयात मिळत नाही. काँग्रेसचे नेते नेहमी गरिबांची थट्टा उडवतात अशी टीकाही रावते यांनी केली. तर यूपीए सरकारचे जे फूड स्टॉल आहे त्या स्टॉलवर सुद्धा 12 रूपयात जेवण मिळत नाही. असं विधान करणं अत्यंत चुकीचं आहे अशी प्रतिक्रिया बीजेडीचे खासदार जय पांडा यांनी दिली.

 • prasad

  १२ रुपयात भरपूर जेवण मिळत असेल तर राज बब्बर नि बंगला सोडून गरिबांच्या घरी राहायला यावे मगच कळेल १२ रुपयात काय मिळते. अर्धा कप चाय सुधा ५ रुपयामध्ये भेटतो .मग पोटभर जेवण मिळेल का? निर्लज्जम सदासुखी ह्या खासदारांना थोडीतरी लाज असेल तर विधान मागे घ्यावे .कॉंग्रेस आघाडीने निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे

 • Piyush Sancheti

  मी या सर्व राजकीय नेत्यांना व नियोजन आयोगा तील सर्व सदस्यांना दैनिक सकाळ मार्फत खुले आह्वान करतो कि तुम्ही म्हणताना ग्रामीण भागात दररोज २८ रुपये व शहरी भागात दररोज ३२ रुपये खर्च करणारी व्यक्ती दारिद्रय़रेषेखाली येत नाही, तर माझ्या कडून ३२*३०=९६०/- +९६०/-=१९२०/- रुपये होतात्ना त्याच्या ५ पट म्हणजे ९६००/- रुपये देतो तुम्ही १ महिना भागवून दाखवा उभे आयुष्य तुमची मी चाकरी करील विना मोबदला …

  • Arjun Raut

   mi tumchyasi sahamat ahe mi pan tumchya barobar ahe ……….baghutach kon ase karu shakto

   • Mahesh Natu

    ग्रेट साहेब मी तुमच्या मताशी सहमत आहे अभिमान वाटला तुम्ही बोलल्याचा

 • BHUPENDRA

  KAHI PAU

 • Mahesh Natu

  साला या लोकांनी आता गरिबांचा मजाक बनवला आहे १ रुपयात जेवण देऊन दाखवा नाहीतर कपडे उतरवून फिरा म्हणावं

 • लक्ष्मन

  १२, ५, १ या सर्व रुपयांमध्ये जर जेवण होत तर राजकीय नेत्यांनी त्यांचा मासिक पगार फक्त ३० रुपये घ्यावा म्हणजे त्यांना या जेवणाची चव कळेल.

 • Sunil

  १ रुपया पासून तर ५० रुपया पर्यंत १ वेळचे जेवण ह्या नेत्यांनी घेऊन अथवा
  करून दाखवावे. यांनी जर असे सिद्य करून दाखवले तर मी सर्व जनतेची हमी देतो
  कि जो पर्यंत जीवात जीव आहे सदा सर्वदा कॉंग्रेसची सत्ता राहील. जर असे
  नाही झाले तर कॉंग्रेस वाल्यांनी राजकारण सोडून सरळ सन्यास घ्यावा. देवाने
  जिभेला हाड नाही दिले म्हणून काही पण बोलायचे थोडी तरी लाज धारा
  राज्कार्त्यानो.

 • suhas

  Kahi pan murkha sarkhe bolatat he congress wale bhrashtachar karun hyanchi buddhi sadli aahe

close