‘एमपीएससी’च्या वेबसाईटचा सावळा गोंधळ सुरूच

July 26, 2013 2:49 PM0 commentsViews: 591

Image img_236882_mpscexam2013_240x180.jpg26 जुलै : राज्य लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीचं आणखी एक रडगाणं सुरू झालंय. ऑन लाईन अर्ज भरण्याची एमपीएससीची वेबसाईट कामच करत नसल्यानं अर्जदारांपुढं मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. या वेबसाईटचा सर्वर डाऊन झाल्यानं ही समस्या निर्माण झालीय. mpsc.gov.in या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर mahaonline.gov.in इथं अर्ज भरावा लागतो. मात्र सर्वर डाऊन असल्यानं त्यावर अर्जच स्वीकारले जात नाहीत.

शिवाय चलनही जनरेट होत नसल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहेत. विद्यार्थ्यांच्या डेबिट कार्डही लॉक होत आहेत. ज्यांचे पेमेंट होऊ शकलंय त्यांचं पेमेंट बँकेत जमा होत नाही. 5 ऑगस्ट ही पीएसआय पदासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे तर सिव्हिल सर्व्हिस, राज्य इंजिनियरिंग सेवेसाठी अर्ज भरण्याची शेवटची 12 ऑगस्टतारीख आहे. अंतिम तारखा जवळ येऊ लागल्यानं अर्जदारांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय.

close