कोल्हापुरात पावसाची संततधार,पुराचा धोका वाढला

July 26, 2013 1:40 PM0 commentsViews: 198

Image img_163702_kolhapurrain.transfer.jpgyrth_240x180.jpg26 जुलै : कोल्हापूर जिल्ह्यातल्या धरणक्षेत्रामध्ये पावसाची संततधार सुरुच आहे. गेल्या 24 तासांमध्ये शहरात आणि इतर तालुक्यांमध्ये पावसानं उघडीप दिली होती. मात्र आज सकाळपासून पश्चिम भागामध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढलाय. जिल्ह्यातली 100 गावं अंशतः संपर्कहिन झाली आहेत.

जिल्ह्याला पुन्हा एकदा महापुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. पंचगंगा नदीची पातळी ही 41 फुटांवर गेलीय. तर राधानगरी धरणाच्या 3 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातले 75 बंधारे आजही पाण्याखाली असल्याने ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झालंय. त्याचबरोबर शहरात दूध आणि भाजीपाल्याची आवक घटली असून अनेक ठिकाणी घरांची पडझड झालीय. कोल्हापूर -गगनबावडा मार्ग आहजी बंदच आहे.

 

पश्चिम महाराष्ट्रातल्या धरणांमधून सुरु असलेला विसर्ग

  • राधानगरी – 7,800 क्युसेक
  • वारणा – 19,000 क्युसेक
  • काळम्मावाडी – 8,000 क्युसेक
  • कोयना – 63,000 क्युसेक
  • अलमट्टी     – 1 लाख 60,000 क्युसेक
close