ओबामांची स्पेशल कार

January 25, 2009 5:28 PM0 commentsViews: 12

25 जानेवारी सगळ्या जगावर राज्य करणारा देश अमेरिका. तो ज्याच्या हातात आहे ते बराक ओबामा. यांची गाडी सुध्दा जगातल्या सगळ्या गाड्यांमध्ये वेगळीचं अशी असणार. एक नजर टाकूया बराक ओबामांच्या विशेष गाडीवर.यावर गोळ्यांचा वर्षाव झाला तरी काही परिणाम होणार नाही. बॉम्बदेखील याला उडवू शकत नाही. आणि परवानगी शिवाय यात उजेड सुध्दा जाऊ शकत नाही.म्हटलं तर घरा सारखचं आरामशीर. तरी सुध्दा त्यात ऑफिसमधल्या सगळ्या सुख-सोयी ही एक अशी कार आहे की जी रस्त्यावरुन जाताना तिच्या आड येण्याची कोणाचीही हिंमत नाही.जर चुकून कोणी या कारच्या आड यायची हिंमत केलीचं तर ही कार एखाद्या जनावरा प्रमाणे हिंसक बनते म्हणूनच ह्या कारला नाव मिळालयं द बीस्ट.बीस्ट नावाला शोभेल असाचं लूक या गाडीला देण्यात आला आहे. गाडी अशी आहे की बघणारे दंग होऊन जातील. दुष्मनांच्या नजरेतून तसंच त्यांच्या कृतीतून ही गाडी आणि त्यातील प्रवासी निर्धास्त राहू शकतील.द बीस्ट जनरल मोटर कंपनीची असून कारची लांबी-18 फूट आहे तर उंची 5 फूट 10 इंच इतकी आहे. 15 सेकंदाच्या आत ही डिझेल कार ताशी 96 कि.मी.चा वेग घेते. या कारची किंमत आहे 2 कोटी 13 लाख रुपये. पण कोणताही करोडपती आपल्याकडच्या पैशातून या गाडीची मजा घेऊ शकत नाही कारण ही कार बनवली गेली आहे फक्त अमेरिकेच्या राष्ट्रपतींसाठी. अमेरिकेच्या राष्ट्रपतींची गरज आणि मागणीनुसार ही गाडी बनवण्यात आली आहे.या संपूर्ण गाडीत 2.6 टनच आर्मर प्लेटिंग करण्यात आलं आहे. म्हणजे कोणत्याही गोळीपासून तसचं रासायनिक हल्ल्यापासून गाडी वाचू शकेल.या गाडीच्या सगळ्या काचा बुलेटप्रूफ आहेत. ह्या गाडीची बॉडी दोन प्रकारे बनवण्यात आली आहे. स्टील,ऍल्युमिनियम,टिटानियम तसंच सिरॅमिकचा वापर करून बनवण्यात आली आहे.या गाडीच्या खाली बॉम्ब ठेवून जरी स्फोट करण्यात आला. तरी देखील ही गाडी सुरक्षित राहील. कारण पाच मोठ्या स्टील प्लेट गाडीखाली लावण्यात आल्या आहेत. पेट्रोलच्या टाकीला सुध्दा आर्मर प्लेटिंग करण्यात आलं आहे. गाडीवर खास पध्दतीचं फोम लावण्यात आलं आहे. ज्यामुळे गाडीला आग लागू शकत नाही.या गाडीचे टायर सुध्दा खास आहेत त्यामुळे ही गाडी कधीचं पंक्चर होऊ शकत नाही. त्याच बरोबर आतील भागात स्टील प्लेटिंग करण्यात आलं आहे. म्हणजे टायरचा ब्लास्ट झाला तरी गाडीला वेगात पळवता येईल. द बीस्ट मध्ये पुढील भागात नाईट व्हिजन कॅमे-याची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे अंधारातदेखील गाडीमध्ये बसलेल्यांना बाहेरच्या हालचालीवर नजर ठेवता येईल. याशिवाय गाडीत पंप ऍक्शन आणि अश्रू गॅसचे गोळेसुध्दा आहेत.

close