इंद्रायणीत कोसळलेली कार सापडली

July 26, 2013 9:16 PM0 commentsViews: 1362

26 जुलै : आळंदीच्या पुलाचा कठाडा तोडून इंद्रायणी नदीत पडलेल्या गाडीचा अखेर तीन दिवसांनी शोध लागलाय. पांढर्‍या रंगाची ही तवेरा गाडी आहे. पण गाडीत असलेल्या दोन जणांचा शोध मात्र अजूनही लागलेला नाही. एनडीए, नेव्ही आणि एनडीआरएफ च्या मदतीने ही कार काढण्यात आली. एम एच 14 बी.ए. 1721 असा या कारच नंबर आहे. या कार मध्ये दोन व्यक्ती प्रवास करत असल्याच माहिती मिळत आहे. मात्र कार मध्ये प्रवास करत असलेल्या दोन व्यक्तीचा अजून शोध लागलेला नाही.

close