भारताचा झिम्बाब्वेवर 58 धावांनी विजय

July 26, 2013 9:35 PM0 commentsViews: 381

india win26 जुलै : झिम्बाब्वे दौर्‍यात भारतानं सलग दुसर्‍या विजयाची नोंद केली आहे. हरारेत झालेल्या वन डे मॅचमध्ये भारताने झिम्बाब्वेचा 58 रन्सने पराभव केला. शिखर धवनच्या सेंच्युरीच्या जोरावर पहिली बॅटिंग करणार्‍या भारताने 294 रन्स केले. शिखर धवननं 116 रन्सची शानदार खेळी केली. तर दिनेश कार्तिकनं 69 रन्स केले. विजयाचं हे बलाढ्य आव्हान झिम्बाब्वेला पेलवलं नाही. झिम्बाब्वेला 9 विकेट गमावत 236 रन्स करता आले. आठव्या क्रमांकावर आलेल्या प्रॉस्पर उत्सेयानं हाफसेंच्युरी केली. तर भारतातर्फे जयदेव उनाडकतने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. या विजयाबरोबरच भारतानं पाच वन डे मॅचच्या सीरिजमध्ये 2-0 अशी आघाडी घेतलीय.

close