आज निवडणुका झाल्या तर भाजप सगळ्यात मोठा पक्ष?

July 26, 2013 10:37 PM0 commentsViews: 1976

bjp big25 जुलै : 2014 च्या लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला लागलेय. आज जर निवडणुका झाल्या तर संपूर्ण देशाचं काय चित्र असू शकतं याबद्दल आयबीएन नेटवर्क आणि द हिंदू यांच्यासाठी सीएसडीएसने सर्व्हे केलाय. या सर्व्हेनुसार भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरेल तर यूपीएला दुसरे स्थान मिळेल असा जनतेनं कौल दिलाय. लोकसभेच्या 543 जागांपैकी एनडीएला 172 ते 180 जागा मिळतील तर यूपीएला 149 ते 157 जागा मिळतील. तर डावे 22 ते 28, सपाला 17 ते 21, बसपाला 15 ते 19 आणि इतर 147 ते 155 जागा मिळतील. या सर्व्हेनुसार पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींना 19 टक्के लोकांनी पसंती दिलीय. त्याच्यापाठोपाठ राहुल गांधींना 12 टक्के आणि मनमोहन सिंग यांनी 6 टक्के लोकांनी पसंती दिलीय.

तर सोनिया गांधी 5 टक्के,मायावती 3 टक्के, अडवाणींना 2 टक्के जनतेनं पसंती दिलीय. पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करावा का? असा प्रश्न विचारला असता 79 टक्के भाजप समर्थकांना नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत तर दुसरीकडे 66 टक्के काँग्रेस समर्थकांनी राहुल गांधींच्या नावाला पसंती दिलीय. तर भाजपमधून पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींच्या नावाला 68 टक्के, लालकृष्ण अडवाणी 12 टक्के, सुषमा स्वराज 5 टक्के,अरूण जेटली 1 टक्का आणि राजनाथ सिंग 1 टक्के पसंती दिलीय.

काँग्रेसच्या गोटातून राहुल गांधींच्या नावाला 48 टक्के पसंती आहे. तर सोनिया गांधींना 16 टक्के, मनमोहन सिंग यांना 14 टक्के, पी.चिदंबरम यांना 2 टक्के पसंती आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कारभारावर 49 टक्के लोक समाधानी आहे. तर महागाईला 34 टक्के जनतेनं केंद्र सरकारला जबाबदार धरलंय. तसंच यूपीएच्या काळात 66 टक्के भ्रष्टाचार वाढलाय असा कौल जनतेनं दिलाय. तर मुस्लिम समाजाचा कौल हा राहुल गांधींच्या बाजून 45 टक्के आहे तर नरेंद्र मोदींच्या बाजून 18 टक्के आहे.

======================================================================
1) कौल देशाचा -लोकसभेच्या जागा (543)

पक्ष/आघाडी — 2009 — जुलै 2013
एनडीए — 159 — 172 ते 180
यूपीए — 262– 149 ते 157
डावे — 24 — 22 ते 28
सपा — 22 — 17 ते 21
बसपा — 21 — 15 ते 19
इतर — 55 — 147 ते 155

======================================================================
2) कोण व्हावा पंतप्रधान?(काँग्रेसशासित प्रदेश)
               2009 — जुलै 2013
नरेंद्र मोदी — 2% — 19%
राहुल गांधी — 6% — 12%
मनमोहन सिंग — 18% — 6%
सोनिया गांधी — 16% — 5%
मायावती — 5% — 3%
अडवाणी — 15% — 2%
माहीत नाही — 20% — 39%
              
======================================================================
3) पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या कामगिरीवर समाधानी?

 •  2011 — 56%
 • जुलै 2013 — 49%

======================================================================
4) पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं वर्णन कसं कराल?

 • प्रामाणिक पंतप्रधान — 25%
 • निर्णयांवर नियंत्रण कमी — 14%
 • अर्थव्यवस्था व्यवस्थित हाताळू शकतात — 10%
 • भ्रष्टाचार वाढू दिला — 9%

======================================================================

5) राष्ट्रीय मुद्दे (आर्थिक स्थिती) देशात आर्थिक स्थिती कशी आहे?

 • - चांगली — 21%
 • - साधारण — 32%
 • - वाईट — 31%

======================================================================
6) महागाईला जबाबदार कोण?

 • केंद्र सरकार – 34%
 • राज्य सरकार – 12%

======================================================================
7) श्रीमंत आणि गरिबांमधल्या दरीत काय फरक पडलाय?

 • वाढली आहे – 45%
 • तेवढीच आहे – 32%
 • कमी झाली – 9%

======================================================================
8) यूपीए-2 सरकार भ्रष्ट आहे?

 • हो — 66%
 • फार भ्रष्ट नाही — 10%
 • भ्रष्ट नाही — 4%
 • माहीत नाही — 20%

======================================================================

9) यूपीए-2 सरकारच्या कालावधीत भ्रष्टाचार वाढला?

 • वाढला — 69%
 • जैसे थे — 15%
 • कमी झाला — 5%
 • माहीत नाही — 11%

======================================================================
10) यूपीए सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लोकांना फायदा झाला?

 • हो — 46%
 • नाही — 54%

======================================================================
11) यूपीए सरकारच्या कोणत्या योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे?

 • मनरेगा — 78%
 • शेतकर्‍यांची कर्जमाफी — 64%
 • अन्न सुरक्षा विधेयक — 19%
 • डायरेक्ट कॅश ट्रान्सफर — 21%

======================================================================
12) अन्न सुरक्षा विधेयकाचा तुमच्या मतदानावर परिणाम होईल?

 • हो — 37%
 • नाही — 28%
 • (ज्या 19% मतदारांना अन्नसुरक्षा विधेयकाबद्दल ठाऊक आहे, त्यांचा कौल)

======================================================================
13) मुस्लिम युवकांना दहशतवादाच्या खोट्या केसेसमध्ये गोवलं जातंय का?

 • हो — 41%
 • नाही — 25%

======================================================================
14) फाशीची शिक्षा रद्द करावी का?

 • हो — 40%
 • नाही — 30%
 • माहीत नाही — 30%

======================================================================
15) नक्षलवाद हा देशाच्या अंतर्गत सुरक्षेला सर्वांत मोठा धोका आहे का?

 • हो — 45%
 • नाही — 13%
 • माहीत नाही — 42%

======================================================================
16 ) नक्षलवादाशी मुकाबला कसा करावा?

 • आदिवासींचे प्रश्न सोडवा — 34%
 • बळाचा वापर करा — 21%
 • नक्षलवाद्यांशी संवाद साधून शस्रसंधीचा प्रयत्नकरा — 16%

======================================================================
17) मोदी x राहुल

                       2009 — जुलै 2013
विभाग — नरेंद्र मोदी — राहुल गांधी
उत्तर भारत– 37% — 29%
मध्य भारत– 41% — 33%
पश्चिम भारत– 43% — 33%
पूर्व भारत– 34% — 30%
दक्षिण भारत– 17% — 37%
पूर्ण भारत — 33% — 31%

======================================================================
18) कौल मुस्लिम मतदारांचा
राहुल गांधी (45%)
नरेंद्र मोदी (18%)

======================================================================
19) पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करावे का?
79% भाजप समर्थकांना वाटतं नरेंद्र मोदींचं नाव भाजपने जाहीर करावं
66% काँग्रेस समर्थकांना वाटतं राहुल गांधींचं नाव काँग्रेसने जाहीर करावं

======================================================================
20) पंतप्रधानपदासाठी पसंती कुणाला?

 • नरेंद्र मोदी — 68%
 • लालकृष्ण अडवाणी — 12%
 • सुषमा स्वराज — 5%
 • अरुण जेटली — 1%
 • राजनाथ सिंह– 1%

======================================================================
21) पंतप्रधानपदासाठी पसंती कुणाला?

राहुल गांधी — 48%
सोनिया गांधी — 16%
मनमोहन सिंग — 14%
पी. चिदंबरम — 2%

======================================================================
22) कोण व्हावा पंतप्रधान?

                2009 — जुलै 2013
नरेंद्र मोदी — 2% — 19%
राहुल गांधी — 6% — 12%
मनमोहन सिंग — 18% — 6%
सोनिया गांधी — 16% — 5%
मायावती — 5% — 3%
अडवाणी — 15% — 2%
माहीत नाही — 20% — 39%

======================================================================

23) पंतप्रधानपदासाठी पसंती कुणाला?

 • नरेंद्र मोदी — 68%
 • लालकृष्ण अडवाणी — 12%
 • सुषमा स्वराज — 5%
 • अरुण जेटली — 1%
 • राजनाथ सिंह– 1%

======================================================================

24) कोणत्या पक्षाला मिळणार किती जागा? (जुलै 2013)

पक्ष/आघाडी — मतांची टक्केवारी — लोकसभेच्या जागा

एनडीए — 29% — 172 ते 180
यूपीए — 29% — 149 ते 157
डावे — 6% — 22 ते 28
सपा — 4% — 17 ते 21
बसपा — 6% — 15 ते 19
इतर — 26% — 147 ते 155

======================================================================
25) मतांची टक्केवारी

पक्ष/आघाडी — 2009 — जुलै 2013 — बदल
एनडीए — 25% — 29% — +4%
यूपीए — 37% — 29% — -8%
डावे — 7% — 6% — -1%
सपा — 3% — 4% — +1%
बसपा — 6% — 6% — 0
इतर — 22% — 26% — +4%

======================================================================
26) सर्वांत मोठा पक्ष कोणता?

एनडीए (172 ते 180) = भाजप — 156 ते 164 + मित्रपक्ष — 13 ते 19
यूपीए (149 ते 157) = काँग्रेस — 131 ते 139 + मित्रपक्ष — 15 ते 21

======================================================================
27) प्रादेशिक पक्षांचा वाढता दबदबा

                    पक्ष — लोकसभेच्या जागा

 • तृणमूल काँग्रेस — 23 ते 27
 • अण्णा द्रमुक — 16 ते 20
 • जनता दल (यु) — 15 ते 19
 • बीजू जनता दल — 12 ते 16
 • YSR काँग्रेस — 11 ते 15
 • राष्ट्रीय जनता दल — 8 ते 12
 • तेलुगू देसम — 6 ते 10
 • तेलंगणा राष्ट्र समिती — 5 ते 9

======================================================================

close