प्रजासत्ताक दिनी कडोकोट बंदोबस्त

January 26, 2009 5:31 AM0 commentsViews: 2

26 जानेवारी, दिल्लीप्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षा दलाचे 25 हजार जवान तैनात करण्यात आले आहेत. कमांडोंचा खडा पहारा आणि हवाई निरीक्षण करण्यात येतंय. यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनी भारताला अनेक दहशतवादी संघटनांकडून धोका आहे. गुप्तचर संस्थांकडून याबाबतचे नेमके इशारे पहिल्यांदाच देण्यात आले आहेत. दिल्ली आणि चंदीगडमध्ये चॉपरच्या साहाय्यानं अतिरेकी हल्ला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रजासत्ताक दिनी चॉपर्सना परवानगी नाकारण्यात आलीय. तसंच, चॉपर भाड्यानं घेण्यासाठीची मार्गदर्शक तत्वं तयार केले जात आहेत. दक्षिणेतल्या एअरपोर्ट्सना एकाच महिन्यात विमान अपहरणाच्या तीन धमक्या मिळाल्यात. आसाम, झारखंड, पश्चिम बंगालमध्ये फिदायीन हल्ल्याचा धोका आहे. 50 अतिरेक्यांनी इथे बांग्लादेशातून घुसखोरी केल्याची माहिती मिळाली आहे.

close