मुंबईत राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण

January 26, 2009 4:49 AM0 commentsViews: 4

26 जानेवारी, मुंबईमहाराष्ट्राचे राज्यपाल एस सी जमीर यांच्या हस्ते शिवाजीपार्क इथं ध्वजारोहण करण्यात आले. यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राज्याचे मुख्य सचिव जॉनी जोसेफ, कामगारमंत्री नवाबमलिक आदि मान्यवर उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर वेगवेगळ्या सेनादलांतर्फे राज्यपालांना मानवंदना देण्यात आली. यामध्ये भारतीय नौसेना, मुंबई पोलिस, राज्य राखीव दल, महाराष्ट्र होमगार्ड, फायर ब्रिगेड, राज्यातलं एन सी सी दल, महिला पोलीस आणि स्काऊट गाईड यांचा समावेश होता. राज्यपालांनीही उघड्या मोटारीतून या दलांच्या संचलनाची पहाणी केली . यावेळेला या संचलनात जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र ग्रेनेड हल्ल्यालाही तोंड देऊ शकणार्‍या एस आर पीच्या नव्या जीप्स आणि भारतीय हरीत क्रांतीची माहिती देणारा चित्ररथ यांचाही समावेश होता.

close