विदर्भ:मृतांच्या नातेवाईकांना अडीच लाखांची मदत

July 27, 2013 3:46 PM0 commentsViews: 539

cm in vidharbha327 जुलै : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी आज पूर्व विदर्भातल्या पूरग्रस्त भागाची पाहणी केली. पूरग्रस्त भागाची पाहणी करताना पडलेल्या घरांच्या ठिकाणी जाऊन मुख्यमंत्र्यांनी लाभार्थ्यांना चेक दिले. चंद्रपूरमध्ये पुरात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना दीड लाखांऐवजी अडीच लाख रुपये मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

मुसळधार पावसामुळे नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये पिकांचं मोठं नुकसान झालंय. दुपारी चंद्रपुरात आलेल्या मुख्यमंत्र्यांनी संजय नगर आणि रहमत नगर या दोन ठिकाणी भेट दिली आणि जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधी आणि अधिकार्‍यांची बैठकही घेतली.

पण चंद्रपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्वाधिक नुकसानं झालं असताना मुख्यमंत्र्यांनी ग्रामीण भागाला भेट देणं टाळलं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या दौर्‍यावर ग्रामीण भागातल्या शेतकर्‍यांनी आणि लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याबाबत नाराजी व्यक्त केली.

close