नांदेडमध्ये स्वाइन फ्लूमुळे तरूणाचा मृत्यू,24 जणांना बाधा

July 27, 2013 2:49 PM0 commentsViews: 186

h1n127 जुलै : नांदेडमध्ये H1N1 मुळे एका 28 वर्षाच्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. अशोक कोल्हेन असं या तरुणाचं नाव आहे. तो हिंगोली जिल्ह्यातल्या सावरगावचा रहिवासी होता. दोन दिवसांपूर्वी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी केलेल्या तपासणीनंतर त्याला एच1 एन1 (H1N1) ची बाधा झाल्याचं स्पष्ट झालंय. पण हा अहवाल येण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. नांदेडमध्ये आतापर्यंत 320 रुग्णांची तपासणी करण्यात आलीय. त्यापैकी 54 रुग्ण संशयित आढळले आहेत. तर 24 रुग्ण पॉझिटीव्ह आढळलेत. त्या सर्वांवर उपचार सुरू आहेत.

close