रत्नागिरी-सिंधुदुर्गात लेप्टोच्या साथीचं थैमान

July 27, 2013 1:58 PM0 commentsViews: 167

SINDHU_LEPTO.transfer27 जुलै :रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात डेंग्यू आणि लेप्टोस्पायरोसिस च्या साथीनं पुन्हा डोकं वर काढलंय. जिल्ह्यात आत्तापर्यंत लेप्टोचे 8 तर रत्नागिरीत लेप्टोचे 4 रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय सिंधुदुर्गात डेंग्यूच्या 15 रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. अत्यंत धोकादायक आणि जीवघेण्या तापाच्या साथीमुळे दोन्ही जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झालीय. ग्रामीण भागातल्या रुग्णांनी खाजगी दवाखान्यात वेळ न घालवता सरकारी रुग्णालयात तातडीनं दाखल व्हावं असं आवाहन आरोग्य यंत्रणेकडून करण्यात येतंय. मात्र लेप्टोच्या रुग्णांमध्ये पांढर्‍या पेशींची संख्या झपाट्याने कमी होत असल्याने रूग्णाला या पेशी देण्याची यंत्रणा रत्नागिरीच्या सरकारी रुग्णालयात उपलब्ध नसल्यामुळे अशा रुग्णांना डेरवणच्या वालावलकर रुग्णालयात उपचारांसाठी पाठवण्यात येतंय. दोन्ही जिल्ह्यात मलेरीयाचेही रुग्ण आढळून येत असल्यामुळे आरोग्य विभागाकडून सर्वत्र सर्व्हेक्षण सुरू झालंय.

close