तेलंगणा स्वतंत्र होणार?

July 27, 2013 5:32 PM1 commentViews: 493

telangana27 जुलै : येत्या 5 ऑगस्टपासून सुरू होणार्‍या पावसाळी अधिवेशनापूर्वी तेलंगणाबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी याबाबतचा अंतिम निर्णय घेणार असल्याचं कळतंय. शुक्रवारी याबाबत काँग्रेसची एक महत्त्वाची बैठक झाली.

त्यानंतर बोलताना काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी चर्चेची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता निर्णयाची वेळ आल्याचं सांगितलं. त्यापूर्वी सोनिया गांधी यांनी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री किरण रेड्डी यांच्याशी चर्चा केली होती.

5 वर्षासाठी हैदराबाद ही दोन्ही राज्यांची संयुक्त राजधानी करण्याचा काँग्रेसचा विचार सुरू आहे. पण स्वतंत्र तेलंगणाला आंध्र प्रदेशातल्या नेत्यांचा तीव्र विरोध असल्यानं काँग्रेसची मात्र पंचाईत झालीय.

 

  • sagar bhilare

    deshacha vibhajan karnaare deshdrohi aahet

close