मनसेसैनिकांकडून मजुरांना मारहाण

July 27, 2013 5:54 PM2 commentsViews: 2117

 27 जुलै : रस्त्यावरच्या खड्यांच्या मुद्द्यावरून मनसे आता आक्रमक झालीय. कुर्ल्यातील मनसेचे नगरसेवक दिलीप लांडे यांनी खड्‌ड्यांबाबत ठेकेदारांच्या माणसांना जाब विचारला आणि त्यांना मारहाण सुद्धा केली. ही मारहाण इथंच थांबली नाही तर त्या ठेकेदारांच्या मजुरांना पाणी साचलेल्या खड्‌ड्यातच बसवलं. दोन दिवसांत जर खड्डे भरले नाहीत, तर पुन्हा मनसेचा हिसका दाखवू असा इशाराही लांडे यांनी दिलाय. लांडे यांच्या नंतर आज मनसेच्या आणखी दोन नगरसेवकांनी मुंबईत अशाच स्वरूपाचं आंदोलन केलंय.

  • Gunvant Patil

    हि मारहाण गरीब मजुरांना न करता ठेकेदारांना करणे गरजेचे आहे !

  • Vazir

    Faltugiri Karit Aahet MNS………..shivsenechi Satta Aahe Mahanagarpalikemadhe Tyanna jaun Marhaan Kara

close