शहीद शशांक शिंदेंवर अन्याय झाल्याची गावकर्‍यांची भावना

January 26, 2009 3:16 AM0 commentsViews: 12

26 जानेवारी, रिक्टोलीशिवाजी गोरेशहीद शशांक शिंदे यांना अशोकचक्र का देण्यात आलं नाही? असा सवाल शिंदे यांच्या कोकणातल्या रिक्टोली गावानंही विचारलाय. या गावानं शशांक शिंदे यांचा स्मृतीस्तंभही उभा केलाय. पण या शूर वीराचं बलिदान सरकारला महत्वाचं का वाटलं नाही, याची खंत गावकर्‍यांना वाटत आहे.सह्याद्रीच्या कडेकपारीत वसलेलं हे कोकणातलं चिपळूणजवळचं रिक्टोली गाव. आणि गावातलं हे शहीद शशांक शिंदे यांचं घर. या घराला आणि गावाला अभिमान आहे, आपल्या निधड्या छातीच्या सुपुत्राचा. देशासाठी त्याने केलेल्या बलिदानाचा. ""असं आर आर पाटील म्हणतात दहा एक हजार लोकांना मारायचे होते पण त्यांचा प्लॅन चुकला आणि ह्याच्या होशियारीमुळे त्यांचा प्लॅन फ़सला आणि तो पळाला आणि दुसरा जो होता त्याने मागाहून गोळ्या घातल्या आणि तीन चार गोळ्या ह्याच्या पोटात घुसल्या आणि तो खाली पडला." असं शशांक शिंदे यांचे वडील चंद्रसेन शिंदे यांनी सांगितलं.रिक्टोली गावात दै. सागरच्या पुढाकाराने शहीद शिंदे यांचा स्मृतीस्तंभ उभा राहिलाय. पण या शूर वीराला अशोकचक्र न देऊन सरकारनं शिंदे परिवार आणि गावाच्या जखमेवर मीठ चोळलंय, असं गावकर्‍याचं म्हणणं आहे. "हा आमच्यावर अन्याय आहे.त्या तिघांबरोबरच हा पण लढून मेलेला आहे.ह्याचं डिक्लेर करून रद्द का करण्यात आलं ह्याच्यासाठी दसपटकर रस्त्यावर पण उतरणार आहोत." असं रिक्टोलीचे सरपंच दिनेश शिंदे यांनी सांगितलं.अशोकचक्र यादीतून शिंदे यांचं नाव वगळण्यात राजकारण झालंय. ते काही काळात समोर येईलच. पण या जिगरबाज अधिकार्‍याच्या बलिदानाशी झालेल्या खेळानं मात्र गावकर्‍यांच्या मनाला जखम केली आहे.

close