आज वाघोबांचा दिवस, वाघांची शिकार थांबणार कधी?

July 29, 2013 2:38 PM1 commentViews: 286

Image img_219242_tigar34_240x180.jpg29 जुलै : जंगलाचा राजा वाघ…याचा आज दिवस…पण गेल्या काही वर्षात या राजाची संख्या कमी झाल्यामुळे ‘सेव्ह टायगर’ अशी हाक देण्याची नामुष्की ओढावली. वाघाची कातडी, नखं यासाठी गेल्या काही वर्षात हजारों वाघांची शिकार झाली. 2012 च्या शेवटीला वाघाची संख्या देशभरात फक्त 1,500 इतकीच राहिली असा अहवाल होता. सेव्ह टायगर या मोहिमेमुळे वाघांच्या शिकारींना आळा बसला खरा पण वाघांची शिकार अजूनही होत आहे. आज टायगर कॉन्झर्वेशन डे निमित्त वाघोबांच्या सुरक्षेसाठी काय काय केलं जात आहे याचा आढावा… नागपूरजवळ पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघांना कृत्रित अधिवासात वाढवण्याचा देशातला पहिला प्रयोग सुरू आहे. पण, या प्रयोगावरून आता वादही सुरू झालाय.

 
2009 मध्ये चंद्रपूरमधल्या गोंडपिपरी जंगलात या तीन वाघांची आई हरवली आणि तेंव्हापासून त्यांना वन विभागानं वाढवलं. सध्या त्यांना नागपूरजवळच्या पेंच व्याघ्र प्रकल्पात साडे तीन एकरात तयार केलेल्या एन्क्लोजरमध्ये ठेवण्यात आलंय. वाघाची अशा पद्धतीने संवर्धन करण्याची ही पहिलीच वेळ…पण, हा प्रकल्प यशस्वी होईल का याबाबत साशंकता आहे. एक कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या या प्रकल्पावर पर्यावरणवाद्यांनी टीका केली आहे.

 
वाघांना अशाप्रकारे वाढवण्याची गरज कायच काय असा सवाल सातपुडा फाऊंडेशनचे प्रवक्ते किशोर रिठे यांनी विचारलाय.वाघांना अशाप्रकारे कृत्रिम वास्तव्याच्या ठिकाणी ठेवण्यापेक्षा वाघांच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न करावे, अशी व्याघ्र प्रेमींची मागणी आहे. पेंचमध्ये वाघ जंगलात मोकळे वावरत असतांना या तीन वाघांना त्याच ठिकाणी बंदिस्त का ठेवण्यात आलंय, या बद्दलही पर्यावरणवादी आर्श्चय व्यक्त करत आहेत.

 

नागझिरा अभयारण्यामध्ये उरले फक्त 6 वाघ

 

गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्यामध्ये सन 2011 – 12 च्या गणनेमध्ये वाघांची संख्या ही 8 होती पण सध्याच्या गणनेत ही संख्या ही 6 आहे. त्यातही एक वाघ हा मध्य प्रदेशात स्थानांतरीत झाला आहे. नागझिरा अभयारण्यातील राष्ट्रपती, विरु आणि आणखी एक अशा तीन वाघांची मागील सहा महिन्यापासून हालचाली जंगलातील सीसीटीव्ही कॅमेरात सापडल्या नाही. त्यामुळे या वाघांचीही शिकार झाली असल्याचीही भीती वन्यजीव तज्ञांकडून व्यक्त केली.

 

दोन वाघांची शिकार ही नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी येथे करण्यात आली. तर रामटेक येथ दोन वाघाची, गोंदिया जिल्ह्यातील तुमसर – तिरोडा येथेही दोन वाघांची आणि  उमरेड मध्ये एका वाघाची शिकार करण्यात आली आहे. मध्यप्रदेशातील मांडाला आणि सिवनी येथील चुई येथे दोन वाघांची शिकार करण्यात आल्याचाही कबुलीजबाब या तिघांनी दिला आहे.

 

एकीकडे विदर्भात वाघांची संख्या वाढत असल्याचे चित्र असतांना या शिकार्‍यांची टोळीच्या कबुलीजबाबानंतर खळबळ उडाली आहे. त्यामुळे वाघांची संख्या वाढल्याच्या दावा करुन स्वताच्याच पाठीवर शाब्बासकी देणार्‍या वनविभागाच्या गलथान पणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

 

बहेलिया समाजातील टोळी ही दर उन्हाळ्यात शिकारीचे काम करते हे वन विभागाला माहित आहे. शिवाय या तिघांपैकी एक आरोपी हा अस्वलाच्या शिकारी प्रकरणी वनविभागाच्या कोठडीत होता. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीवर नागपूर ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली त्यामुळे वनविभागाच्या कार्यक्षमते वर या घटनेमुळे प्रश्न उपस्थीत झाला आहे.

 
 

 

  • Rajendra Dhage

    जंगलाचा राजा वाघ…याचा आज दिवस…पण गेल्या काही वर्षात या राजाची संख्या कमी
    झाल्यामुळे ‘सेव्ह टायगर’ अशी हाक देण्याची नामुष्की ओढावली. एक थ टायगर…….

close