दिवाकर रावतेंचं निलंबन मागे ?

July 29, 2013 3:17 PM0 commentsViews: 421

divakar ravate29 जुलै : विधान सभेत सभापतींशी असभ्य वर्तन केल्याचा ठपका ठेवत निलंबित करण्यात आलेल्या शिवसेना आमदार दिवाकर रावतेंचं निलंबव उद्या मागे घेतलं जाणार आहे. उद्योगमंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विनोद तावडे यांच्या बैठकीत हा तोडगा निघालाय.

याआधी रावते यांनी विधान परिषदेच्या सभापतींकडे लेखी पत्र लिहून माफी मागितली होती. त्यामुळे त्यांचं निलंबन मागे घेतलं जातंय. पण विधानसभेत शिविगाळ करणारे मनसेचे आमदार प्रवीण दरेकर यांचं निलंबन मात्र कायम राहील, हे स्पष्ट दिसतंय.

मागिल शुक्रवारी दिवाकर रावते यांनी सभापती शिवाजी देशमुख यांच्या दालनात सिंचनावर चर्चा व्हावी अशी मागणी केली होती. यावेळी रावते यांनी असभ्य वर्तन केलं म्हणून त्यांच्यावर 31 डिसेंबरपर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. तर मनसेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी सभागृहात मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ केली म्हणून दरेकरांना 31 डिसेंबरपर्यंत निलंबित करण्यात आलंय.

close