‘राज्यसभेची खासदारकी 100 कोटीत मिळते’

July 29, 2013 2:02 PM0 commentsViews: 613

birandar singh29 जुलै : राज्य सभेच्या जागा विकत घेता येतात आणि सध्या काही जण तब्बल 100 कोटी रूपयाला राज्यसभेच्या जागा विकत घेतायेत असा खळबळजनक दावा हरियाणाचे काँग्रेसचे खासदार बिरेंद्र सिंग यांनी केलाय. असे जागा विकत घेतलेले खासगार गरिबांसाठी काही कामं करणार नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.

 

जेव्हा भाजपनं त्यांना पुरावा मागितला, तेव्हा घुमजाव करत सिंग म्हणाले की, त्यांना असं म्हणायचं होतं की पैशाचं पाठबळ असलेले जास्त लोक राजकारणात येत आहे. अगोदरच काँग्रेसच्या नेत्यांनी गरिबांची थट्टा उडवणारे वक्तव्य केलंय. त्यामुळे देशभरातून जनतेच्या रोषाला काँग्रेसला सामोरं जावं लागलंय.

 

हा वाद शमत नाही तोच पुन्हा एकदा बिरेंद्र सिंग यांनी नवा वाद निर्माण केलाय. काँग्रेसने या प्रकरणी बिरेंद्र सिंग यांच्याकडून सफाई मागितली आहे. तर भाजप नेते किर्ती आझाद यांनी बिरेंद्र सिंग यांच्या विधानाची निवडणूक आयोगाने चौकशी करावी अशी मागणी केलीय.

close