शेगावमध्ये 67 विद्यार्थीनींना जेवनातून विषबाधा

July 29, 2013 1:38 PM0 commentsViews: 210

SHEGAON FOOD POISIONING4अकोला 29 जुलै : मिड डे मिल विषबाधेचं प्रकरण ताजे असतांना राज्यभरात आता विषबाधेच्या वेगवेगळ्या घटना समोर येतायत. अकोला जिल्ह्यातील शेगावमध्ये 67 विद्यार्थ्यांना विषबाधा झालीय. मुलींच्या आंबेडकर वसतीगृहात संध्याकाळच्या जेवणानंतर हा प्रकार घडलाय.

त्यांना रात्री भाकरी आणि उडदाची डाळ असं जेवण देण्यात आलं होतं. हे अन्न शिळं असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. या वसतीगृहात पाचवी ते दहावीच्या विद्यार्थींनी राहत आहे. या विद्यार्थीनींना ताबडतोब शेगावच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं.

यापैकी 20 मुलींची प्रकृती गंभीर असल्याचं समजतंय. एका मुलीला उपचारांसाठी अकोल्याला हलवण्यात आलंय. या संपूर्ण घटनेनंतर वसतीगृहातील जेवणाच्या दर्जा संदर्भातला प्रश्न उपस्थीत झालाय. या घटनेची पालीस चौकशी करत आहे.

close