नाशिकमध्ये बंधारा कोसळून 5 अभियंते ठार

July 29, 2013 4:32 PM0 commentsViews: 1173

bandhara nasik29 जुलै : नाशिक येथील चिंचवे गावाजवळ बंधार्‍याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या पाट बंधारे खात्याच्या 5 अभियंत्यांचा बंधारा कोसळल्यामुळे मृत्यू झालाय. तर 1 जणांची प्रकृती गंभीर होती त्यांना तांदूळी येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. आज दुपारी 1.50 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

या पाचही अधिकार्‍यांमध्ये दोन उप अभियंता आणि 3 सहाय्य अभियंता आहे. चिंचवे गावात 25 फुटांचा हा मातीचा निकृष्ट बंधारा होता. या बंधार्‍याची पाहणी करण्यासाठी लघू पाटबंधारे खात्याचे हे पाच अधिकारी बंधार्‍यावर पोहचले होते. या बंधार्‍यांचं काम सुरू होतं. हे पाचही कर्मचारी बंधार्‍यावर बसलेले होते. काही कळायच्या आतच अचानक हा बंधार कोसळला.

बंधार्‍याच्या मातीच्या ढिगाराखाली हे पाचही कर्मचारी दबले गेले. यात चौघांचा मृत्यू झाला. तर एक कर्मचार्‍याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय पण उपचारादरम्याना त्यांचा मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे हा बंधारा निकृष्ट दर्जाचा होता अशी तक्रार येथील स्थानिकांनी वारंवार केली होती. एवढेच नाही तर या प्रकरणी आतापर्यंत काही अधिकारी निलंबितही करण्यात आले आहे.

close