शिर्डीत सीरियल किलिंग, 4 भिकार्‍यांची डोक्यात दगड घालून हत्या

July 29, 2013 5:10 PM0 commentsViews: 768

shirdi mureder129 जुलै : शिर्डी महिन्याभरापुर्वीच भिकार्‍यांच्या हत्येनं हादरलं होतं. मात्र आज सोमवारी पुन्हा एकदा चार भिकार्‍यांची निर्घृणपणे हत्या केल्याचं उघड झालंय. या चार भिकार्‍यांची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आलीय. शहरातील रेल्वे स्टेशन परिसर, गेस्ट हाऊस आणि एका हॉटेलजवळ या तीन हत्या झाल्यात. त्यानंतर दुपारी विश्रामगृहाजवळ आणखी एका भिकार्‍याचा मृतदेह सापडलाय. त्यापाठोपाठ आणखी एका भिकार्‍याच्या डोक्यात दगड घालण्यात आलाय. मात्र यातून तो बचावला असून बेशुद्ध आहे. त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. एकूण पाच जणांच्या हत्येचा प्रयत्न झालाय.

महिन्याभरापूर्वी दोन भिकार्‍यांची याच पद्धतीने हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज प्रसिद्ध केलं होतं. सीसीटीव्ही फुटेजमध्ये किलरचा चेहर कैद करण्यात आला होता. पोलिसांनी संशयित म्हणून एकाला ताब्यातही घेतलंय. पण आज पुन्हा एकदा सिरियल किलिंगची घटना घडल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. शिर्डीत जेव्हा रेल्वे स्टेशनवर दोन भिकार्‍यांची हत्या झाली तेंव्हा या प्रकरणाचा तपास रेल्वे पोलिसांकडे होता.

पोलिसांनी मारेकर्‍याचा चेहरा प्रसिद्ध करूनही त्याला पकडण्यात पोलिसांना अपयश आलं. दुसरीकडे मनमाड पोलिसात एक डीवायएसपी आहे त्यामुळे त्यांना कामाच्या व्यापामुळे घटनेकडे लक्ष द्याला वेळ मिळत नाहीय. या व्यतिरिक्त एकच एपीआय आहेत ते या प्रकरणाचा तपास करत आहे. त्यामुळे या तपासात पोलिसांना मर्यादा असल्याचं दिसून आलंय. रेल्वे स्टेशन परिसरात दोन भिकार्‍यांची हत्या झाली तेंव्हा पोलिसांना आरोपीला पकडता न आल्यामुळे आज चार जणांना जीव गमवावा लागलाय.

close