वाळू माफियांवर कारवाई, IAS अधिकारी निलंबित

July 29, 2013 5:35 PM0 commentsViews: 622

up ias officer429 जुलै : उत्तर प्रदेशात वाळू माफियांवर कारवाई करणार्‍या आयएएस अधिकार्‍याला निलंबित करण्यात आल्यानंतर वाद निर्माण झालाय. दुर्गा शक्ती नागपाल या उपजिल्हाधिकारी म्हणून काम करणार्‍या महिला अधिकार्‍याला रविवारी उत्तर प्रदेश सरकारनं निलंबित केलंय.

कामामध्ये अनियमितपणा असल्याचं कारण देऊन राज्य सरकारने नागपाल यांच्यावर कारवाई केली. पण नागपाल यांनी वाळू माफियांवर कारवाई केल्यामुळेच त्यांना निलंबित करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केलाय.

या प्रकरणी नागपाल आणि उत्तर प्रदेशच्या आयएएस असोसिएशननं आज उत्तर प्रदेशच्या मुख्य सचिवांची आज भेट घेतली. या प्रकरणी आपण लक्ष घालू असं आश्वासन मुख्य सचिवांनी नागपाल यांना दिलंय.

close