पोलिसांच्या कुटुंबीयांच्या हक्काच्या घरासाठी मोर्चा

July 29, 2013 5:38 PM0 commentsViews: 90

POLICE MORCHA329 जुलै : मुंबईत हक्काचं घरं मिळावं या मागणीसाठी पोलिसांच्या कुटुंबीयांनी आज वरळी बीडीडी चाळींपासून मंत्रालयापर्यंत मोर्चा काढला. बीडीडी चाळीत 3 हजारांपेक्षा जास्त पोलीस वर्षानुवर्ष राहत आहेत. हक्कांचं घरं मिळावं अशी त्यांची मागणी आहे.

मुंबईत अतिक्रमण करणार्‍यांना घरं मिळतात मात्र आम्हाला मिळत नाही अशी नाराजी या कुटुंबीयांनी व्यक्त केली. वरळीतल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी भाजप नेते गोपीनाथ मुंडे आणि आशीष शेलार या मोर्चात सहभागी झाले होते.

close