खड्‌ड्यात ‘पाडणार्‍या’ सरकारला कोर्टाची नोटीस

July 29, 2013 7:55 PM1 commentViews: 526

Image img_189672_mumbaihighcort_240x180.jpg29 जुलै: ‘खड्‌ड्यात’ गेलेल्या जनतेसाठी मुंबई हायकोर्ट धावून आलंय. मुंबई आणि परिसरातील खड्डयांची हायकोर्टाने स्वत:हून दखल घेतली आहे. यासंदर्भात हायकोर्टाने राज्य सरकार, मुंबई महानगरपालिका आणि ठाणे महानगरपालिकेला नोटीस बजावली आहे. रस्त्यांवरच्या खड्‌ड्यांबाबत रिपोर्ट देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. मुंबईतले खड्डे रविवार रात्रीपर्यंत बुजवण्यात येतील अशी घोषणा मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांनी केली होती. पण डेडलाईन उलटून गेल्यानंतरही मुंबईतल्या रस्त्यांवर खड्‌ड्यांचं साम्राज्य कायम आहे.

 

पावसाळा आला की मुंबईत खड्‌ड्यांचं साम्राज्य पसरतं. हा पावसाळाही याला अपवाद नाही. मुंबईतले खड्डे रविवार रात्रीपर्यंत बुजवण्यात येतील अशी घोषणा मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांनी केली होती. पण डेडलाईन उलटून गेल्यानंतरही मुंबईतल्या रस्त्यांवर खड्‌ड्यांचं साम्राज्य कायम आहे. निवडणुकीपूर्वी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी खड्डेमुक्त मुंबईची घोषणा केली होती. पण ही घोषणाही खड्‌ड्यात गेल्याचं दिसून येतंय. मागिल आठवड्यात खड्‌ड्यामुळे अपघात होऊन एका महिलेला जीव गमवावा लागला होता. यानंतर मनसे,शिवसेनेनं मुंबई-पुण्यात आंदोलनं केली होती. अखेर आता कोर्टाने दखल घेत राज्यातील महापालिकांना नोटिसा बजावलीय.

 • Nishikesh

  “अरे जरा लाज वाटू द्या… थोडी जनाची नाही तर मनाची तरी वाटू द्या….”
  खाऊन खाऊन नुसते “टर” झाले आहात. तुम्ही जनतेचे देणे लागतात याचे जरा भान ठेवा.
  मी
  तर म्हणेल, आता मुंबई हायकोर्टाने पुढाकार घेतला आहेच तर होऊन जाऊद्या.
  काढा एकेकाचा हिशोब बाहेर. जनतेलाही कळू द्या या राजकारण्यांनी किती कामं
  जनतेसाठी केलीत आणि किती कामं स्वतः साठी केलीत. कोणाची किती टक्केवारी
  होती ते तर जाहीर होऊ द्या. एकदाचा या भ्रष्टाचारी सत्ताधारी आणि या
  ठेकेदारांचा माज उतरूच द्या. काही लोक मोठ तोंड करून सांगतात, “मागील वर्षी
  पेक्षा यंदा रस्त्यांची कामं चांगली झाली आहेत.” का मागली वर्षी काय धाड
  भरली होती चांगली कामं न होण्याची. मागील वर्षापेक्षा यावर्षी काय नवीन तीर
  मारलाय ते दिसतच आहे. म्हणून तर न्यायालयाला तुम्हाला जाब विचारावा
  लागतोय. शेवटी इथून तिथून सगळे एकाच माळेचे मणी. सगळे चोरच, कुणी पांढरया
  कपड्यातला चोर, तर कुणी काळ्या कपड्यातला चोर… पण चोरच नं.

  निवडणुका
  आले की येतात लाळ गाळत “मत द्या, मत द्या” करत. आणि आता काम करायची
  “बोम्ब”. खाऊन खाऊन जबर झाले आहेत नुसते. आलिशान गाड्यांमधून फिरतात
  त्यांना काय खड्यांच पडलंय.

  जनतेने आता तरी कुठल्या ही आमिषाला बळी न पडता, नीट विचार पूर्वक आपला मत द्यायला हवं .
  नाहीतर पुन्हा असेच होईल, “तुम्हीच मत दिलाय नं, मग तुम्हीच जा खड्यात असंच होईल.”

close