रेश्मा भोसलेंच्या पतीने थकबाकी लपण्यास मदत केली -मोरे

July 29, 2013 9:54 PM0 commentsViews: 510

29 जुलै : पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका रेश्मा भोसले यांची मिळकत कराची थकबाकी लपवण्याकरता त्यंाचे पती राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांनी मध्यरात्री 12 वाजता महापालिकेचं कार्यालय उघडलं आणि कर्मचार्‍यांवर राजकीय दबाव टाकून जुन्या तारखेला डीडी भरलाय अशी पावती तयार केली असा खळबळजनक आरोप मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी केला. मोरे यांनी यासंदर्भातले पुरावेही सादर केलेत. 2012 च्या पुणे महापालिका निवडणुकीदरम्यान हे प्रकरण घडलं होतं. या प्रकरणी 3 जणांना पोलिसांनी अटकही केलीय, पण नगरसेविका रेश्मा भोसलेंवर मात्र अजून कारवाई झालेली नाही.

close