मुंबईत मागील वर्षी टीबीचे 6 हजार 921 बळी

July 29, 2013 10:03 PM0 commentsViews: 152

mumbai tb29 जुलै: मुंबईतल्या आरोग्य व्यवस्थेबद्दल प्रजा फाऊंडेशनं एक श्वेतपत्रिका काढली. या श्वेतपत्रिकेनुसार गेल्या वर्षी मुंबईत टीबीचे 36 हजार 417 पेशंट्स आढळले. त्यापैकी 6 हजार 921 रूग्णांचा मृत्यू झाला. तसेच 2012-13 मध्ये कॉलरामुळे मुंबईत 12 जणांचा मृत्यू झाल्याचं या श्वेतपत्रिक ेत म्हटलं आहे. मुंबईला टीबी आणि कॉलराचा धोका वाढता असल्याचे या फाऊंडेशनचं म्हणणं आहे. महापालिकेनं वार्षिक आरोग्य अहवाल जाहीर करावा अशी मागणी प्रजा फाऊंडेशनने केली आहे. प्रजा फाऊंडेशनं पत्रकार परिषदेत घेऊन ही माहिती दिली.

मुंबईतली आरोग्य व्यवस्था धोक्यात

===============================================
टीबी
- 2012-13 – 6,921 बळी
- गेल्या 5 वर्षांत 39,531 बळी
===============================================
डेंग्यू
गेल्या 5 वर्षांत 293 बळी

===============================================
कॉलरा
गेल्या 5 वर्षांत 33 बळी

===============================================
हायपरटेन्शन
2012-13 – 3,974 बळी
गेल्या 5 वर्षांत 20,040 बळी

===============================================
डायबेटिस
2012-13 – 2523 बळी
गेल्या 5 वर्षांत 12,817 बळी

===============================================
मलेरिया
गेल्या 5 वर्षांत 2859 बळी

===============================================
डायरिया
गेल्या 5 वर्षांत 2024 बळी
 
===============================================

close