‘चर्चेची तयारी पण विरोधकच करतायत दिशाभूल’

July 29, 2013 10:25 PM0 commentsViews: 448

29 जुलै : सिंचनासह कोणत्याही विषयावर चर्चेची सरकारची तयारी आहे पण विरोधकच दिशाभूल करतायत अशी तोफ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डागलीय. तर दुसरीकडे लोकांच्या प्रश्नाबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप करत विरोधकांनी सभागृहातच अभिरुप विधानसभा भरवलीय. विरोध पक्षांच्या आमदारांची भाषणं सुरू आहेत. अनेक विषयांवरून सरकारवर आगपाखड केली जातेय. जनतेचे प्रश्न मांडले तर निलंबन होतं किंवा सभागृहाचं कामकाज तहकूब केलं जातं, असा आरोप विरोधकांनी केलाय. दरम्यान, विरोधकांच्या या आंदोलनाची सत्ताधार्‍यांनी खिल्ली उडवलीय.

close