हायकोर्टाचा BCCIला दणका, नव्याने चौकशीचे आदेश

July 30, 2013 1:54 PM0 commentsViews: 287

Image img_70062_bcci_240x180.jpg30 जुलै : स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बीसीसीआयच्या चौकशी समितीचा अहवाल मुंबई हायकोर्टाने रद्द ठरवलाय. या प्रकरणी पुन्हा संपूर्ण चौकशी करण्याची गरज असल्याचं हायकोर्टाने म्हटलंय. त्यासाठी नवीन समिती नेमण्याचा आदेश कोर्टाने दिलाय.

बीसीसीआयने नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालात माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मयप्पन आणि राजस्थान रॉयल्सचा मालक राज कुंद्रा यांना क्लीन चिट देण्यात आली होती. मात्र, या समितीसाठी नेमण्यात आलेल्या दोन सदस्यांच्या नियुक्तीवरच हायकोर्टाने प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.

या समितीने गोळा केलेल्या पुराव्यांमध्ये विसंगती असल्याचं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं आहे. या समितीविरोधात नरेश मतानी यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. दरम्यान, बीसीसीआय हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागण्याची शक्यता आहे.

close