स्वतंत्र तेलंगणाची आज घोषणा?

July 30, 2013 2:18 PM0 commentsViews: 386

telangana30 जुलै : स्वतंत्र तेलंगणाची आज घोषणा होण्याची शक्यता आहे. या मुद्यावर आज दिल्लीत बैठक सुरू आहे. मात्र या मुद्यावरून काँग्रेसमध्ये अंतर्विरोध वाढतोय. थोड्या वेळापूर्वी आंध्र प्रदेशातले तेलंगणाविरोधी आमदार आणि मंत्र्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. काँग्रेसच्या आंध्र प्रदेशातल्या नेत्यांमध्ये यावरून दोन गट पडलेत. स्वतंत्र तेलंगणाला विरोध करणारे नेते दिल्लीमध्ये आहेत.काँग्रेसचे आंध्र प्रदेशचे प्रभारी दिग्विजय सिंग आणि पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. त्याशिवाय चार वाजता यूपीएच्या समन्वय समितीची बैठक झाल्यानंतर हे नेते पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. दुसरीकडे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री किरण रेड्डी हेही पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. किरण रेड्डी हे स्वतंत्र तेलंगणाच्या विरोधात असल्याचं मानलं जातंय. त्याचवेळी काँग्रेसचे वरिष्ठ नेते स्वतंत्र तेलंगणाच्या निर्णयावर ठाम आहेत. संध्याकाळी साडेपाच वाजता होणार्‍या काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची अपेक्षा आहे.

close