बंधारा दुर्घटनेत मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत

July 30, 2013 1:06 PM0 commentsViews: 309

NSK_BANDHARA.transfer30 जुलै : नाशिकमधीलं पाझर तलावाच्या दुर्घटना प्रकरणी ठार झालेल्या अभियंत्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. पण निलंबित अधिकारी सेवेत नसताना काम दुरुस्त करायला गेले होते असं सांगण्यात आलंय.

पावसाळ्यामध्ये निकृष्ट कामाच्या दुरुस्तीच्या ऑर्डर्स नव्हत्या, असा धक्कादायक खुलासा जलसंधारण मंत्री नितीन राऊत यांनी केला. अधिकार्‍यांनी चुकीची कामं स्वत: दुरस्त करण्याचा अनाठायी धाडस करु नये अशी सूचनाही सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी केलीय.

सोमवारी नाशिकमध्ये चिंचवे गावाजवळ पाझर तलावाचा बंधारा कोसळला होता यात 5 अभियंते ठार झालेत. तलावाच्या बंधार्‍याचं बांधकाम सुरू होतं, या बांधकामाची पाहणी करण्यासाठी पाटबंधारे पथकातले हे पाच अभियंते गेले होते, यावेळी अचानक बंधार्‍याचं बांधकाम कोसळलं आणि यात त्यांचा मृत्यू झाला.

close