ठाणेकर गेले खड्‌ड्यात

July 30, 2013 5:33 PM0 commentsViews: 104

30 जुलै : मुंबई, ठाणे, पुण्यासह नागपूर, कोल्हापूर अशा शहरांत या पावसाळ्यात नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय.दरवर्षी रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधींचा खर्च होऊनही रस्त्यांवर मात्र खड्डेच खड्डे दिसतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे शहरातल्या रस्त्यांवर खड्डे पडलेत. त्रस्त नागरिकांनी हे रस्ते कायमस्वरुपी दुरुस्त कधी होणार, असा सवाल महानगरपालिकेला केलाय. त्यावर पुढच्या 30 दिवसांत शहरातले सगळे खड्डे बुजवण्यात येतील असं आश्वासन पालिकेने दिलंय. गेल्या अर्थसंकल्पात रस्त्यांची डागडुजी आणि काँक्रिटीकरणासाठी 258 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. पण पावसाची उघडीप मिळत नसल्यामुळे खड्डे बुजवता येत नाहीयेत असं जुजबी उत्तर महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी दिलंय.

close