युतीबाबत फेरविचार करू- मुंडे

January 26, 2009 11:39 AM0 commentsViews: 1

26 जानेवारी जालनाशिवसेनेनं पंतप्रधानपदासाठी शरद पवार यांना पाठिंबा दिल्यास युतीचा फेरविचार करू असा इशारा भाजपचे गोपीनाथ मुंडे यांनी दिला आहे. ते जालनामध्ये बोलत होते. याबाबत माहिती अशी की, मराठीच्या मुद्यावरून पंतप्रधान पदासाठी शिवसेना शरद पवारांना पाठिंबा देण्याबाबतचा विचार करू शकते असं विधान नुकतच शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानावर गोपीनाथ मुंडे यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी सांगितलं, अशीच भूमिका घेऊन शिवसेना आमच्या बरोबर जागावाटपाबद्दल बोलणी करण्यासाठी येत असेल तर युतीबाबत आम्ही फेरविचार करू असा इशारा त्यांनी शिवसेनेला दिला. ज्या ज्या वेळेला निवडणुका जवळ येतात त्यावेळी प्रत्येक मित्र पक्ष आपल्या वाट्याला जास्त जागा मिळाव्या म्हणून दुस-यावर असाच दबाव टाकत असतात. तसा काहीसा प्रकार सद्या सेना भाजप युतीत चाललेला दिसत आहे.

close