मनसेचं अनोखं आंदोलन, खड्‌ड्यावर लांबउडी स्पर्धा !

July 30, 2013 6:41 PM0 commentsViews: 782

30 जुलै : औरंगाबादमध्ये रस्त्यावर पडलेल्या खड्डयांमुळे लोक पुरते हैराण झालेत. शहरात प्रत्येक रस्त्यावर खड्डे पडले आहे. महापालिकेच्या विरोधात मनसेनं रस्त्यावर एक अनोखं आंदोलन केलं. मनसेनं खड्‌ड्यांवरच लांबउडी स्पर्धा घेऊन पालिकेच्या कारभाराचा निषेध केला. मनसेच्या वतीने आयोजित या स्पर्धेसाठी बक्षीसही अनोखचं होतं. पालिकेवर शिवसेना भाजपची सत्ता आहे. म्हणून प्रथम क्रमांकाचं बक्षिस धनुष्यबाण तर दुसरं बक्षीस होतं कमळ…विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादी आपली भूमिका पार पाडत नाही. म्हणून तिसरं चौथ बक्षीस होतं हाताचा पंजा आणि घड्याळं..औरंगाबादकरांनी या अनोख्या स्पर्धेला मोठी गर्दी केली होती.

close