ऑस्करच्या ज्युरींत महेश कोठारे-विजय पाटकर

July 30, 2013 9:12 PM0 commentsViews: 952

30 जुलै : प्रतिष्ठेच्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारतातून पाठविण्यात येणार्‍या प्रादेशिक सिनेमांची निवड करण्यासाठी महाराष्ट्रातून निर्माता दिग्दर्शक महेश कोठारे आणि अभिनेते विजय पाटकर यांची निवड झालीय. या कलाकारांची ज्युरी कमिटीवर नेमणूक करण्यात आलीय. ऑल इंडिया फिल्म फेडरेशनने ही नेमणूक केलीय. ऑस्करसाठी भारतातून पाठविण्यात येणार्‍या सिनेमाची निवड ही समिती करणार आहे. सप्टेंबरमध्ये भारतीय सिनेमांचं स्क्रिनिंग होणार असून कोठारे आणि विजय पाटकरा ज्युरीची भूमिका बजावतील.

close