खड्‌ड्यांची जबाबदारी स्विकारत राहुल शेवाळेंचा राजीनामा

July 30, 2013 9:34 PM0 commentsViews: 845

Image img_234502_rahulshevalemumbaicorrporation_240x180.jpg30 जुलै : मुंबईतल्या रस्त्यांवर सध्या खड्‌ड्यांचं साम्राज्य परसलंय. ठिकठिकाणी पडलेल्या खड्‌ड्यांमुळे मुंबईकरांना प्रचंड हाल सहन करावा लागतोय. खड्‌ड्यांची नैतिक जबाबदारी स्विकारात स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी राजीनामा दिलाय. राहुल शेवाळे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवलाय, मात्र उद्धव ठाकरे यांनी राजीनामा फेटाळलाय. राजीनामा देण्याची ही वेळ नाही आधी लोकांना खड्‌ड्यांच्या जाचातून वाचवा अशा कानपिचक्या उद्धव ठाकरे यांनी राहुल शेवाळे यांना दिल्यात.

close