स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला जोर

July 31, 2013 4:50 PM0 commentsViews: 693

VIDARBHA ANDOLA87N31 जुलै : तेलंगणापाठोपाठ आता वेगळ्या विदर्भाची मागणीही जोर धरतेय. विदर्भ संयुक्त कृती समितीने आज नागपूरमध्ये आंदोलन केलं. शहरातील परिवहन कार्यालयासमोर टायर जाळून आणि रस्ता अडवून केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध केला. केंद्र सरकारने तेलंगणा आणि विदर्भाची एकाच वेळी निर्मिती अशी भूमिका मांडली होती.

 

पण आता तेलंगणा स्वतंत्र होत असतांना विदर्भावर अन्याय का असा प्रश्नही आंदोलकांनी यावेळी विचारला. दरम्यान, भाजप आणि आरपीआय वेगळा विदर्भ मागत असतील तरी आम्ही महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेनं घेतलीय. शेकापनंही विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळा करायला विरोध केलाय.

 
विदर्भ संयुक्त कृती समिती स्थापना
विदर्भ समर्थकांनी विदर्भ संयुक्त कृती समितीची स्थापना केलीय. या समितीमार्फत 5 ऑगस्टला दिल्लीतल्या जंतरमंतरवर सर्व पक्षीय विदर्भवादी नेते धरणं आंदोलन करणार आहे. नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्समध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, भाजप आणि आरपीआय वेगळा विदर्भ मागत असतील तरी आम्ही महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेनं घेतलीय. शेकापनंही विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळा करायला विरोध केला.

close