कुपोषणामुळे 9 चिमुरड्यांचा मृत्यू

July 31, 2013 5:05 PM0 commentsViews: 183

javhar31 जुलै : 12 रूपयात जेवण मिळतं असा दावा करून नेत्यांनी गरिबांची थट्टा केली तर दुसरीकडे ठाणे जिल्ह्यात जव्हारमध्ये कुपोषणामुळे या महिन्यात 9 चिमुरड्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. जव्हारमध्ये 250 हून अधिक कुपोषित मुलं असल्याची माहितीही आकडेवारीतून पुढे येत आहे. तर 7 बालकांची प्रकृती अत्यंत गंभीर असून जव्हारच्या ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

 

मे महिन्यात 11 आणि जुन महिन्यात 13 मुलांचा मृत्यू झाला होता. पोषक आहार आणि वैद्यकीय सेवा न पोहोचल्यानं हे बालमृत्यू होत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थ मांडत आहेत. दगावणार्‍या बालकांच्या मृत्युंची कारणं कुपोषण ही नाही तर तत्कालीन आजार असल्याचं आरोग्य यंत्रणेतर्फे सांगण्यात येतंय. मात्र, याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती कॅमेरासमोर देण्यास वरिष्ठांनी नकार दिल्याचं सांगण्यात येतंय. जव्हारमधल्या या वाढत्या कुपोषणाबाबत आणि बालमृत्युंबाबत मनसेच्या वतीनं पंंचायत समितीला घेराव घालण्यात आला.

close