स्वतंत्र तेलंगणाविरोधात आंध्रात 72 तासांचा बंद

July 31, 2013 2:19 PM0 commentsViews: 294

andhara band31 जुलै : तेलंगणाच्या निर्मितीची आज औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे. मंगळवारी काँग्रेस कार्यकारिणीने तेलंगणाला मान्यता दिल्यानंतर रायलसीमा आणि आंध्र भागात नाराजीच्या प्रतिक्रिया उमटल्यात. त्या भागातल्या नेत्यांनी 72 तासांचा बंद पुकारलाय. काही अनुचित घटना घडू नये यासाठी कडक सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. आंध्र भागात बससेवा विस्कळीत झाली आहे. तसंच काही शाळा बंद पाडण्याचेही प्रकार घडलेत. मात्र, तेलंगणा भागात व्यवहार सुरळीत सुरू आहेत. हैदराबादमध्येही व्यवहार सुरळीत सुरू आहेत. मात्र, स्थानिकांमध्ये तेलंगणाच्या मुद्द्यावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटताहेत. तर दुसरीकडे निर्णय मागे घेण्यासाठी संयुक्त आंध्रप्रदेश समर्थक नेते दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत.

close