श्रीलंकन लष्कराचे लिट्टेच्या ठिकाणांवर हवाई हल्ले

January 26, 2009 4:39 PM0 commentsViews: 2

26 जानेवारी लिट्टेचं शेवटचं शहर मुलैतिवू ताब्यात घेतल्यानंतर श्रीलंकन लष्कर आता लिट्टे बंडखोरांच्या मागावर आहेत. लिट्टेचे तीन मोठे बॉम्ब बनवणारे कारखाने ताब्यात घेतल्याचा दावा श्रीलंका लष्करानं केला आहे. तमीळ टायगर्सनी जंगलात आश्रय घेतल्याचं लष्करानं सांगितलं. श्रीलंकन लष्कराचा त्याठिकाणी हवाई हल्ला सुरू आहे. लष्कराच्या हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन लिट्टेनं मुलैतिवूमधलं धरण फोडलं होतं. त्यामुळे लष्कराला शहरात प्रवेश करण्यासाठी बोटीचा वापर करावा लागला होता.

close